उद्देशिका
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी
धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस :
सामाजिक , आर्थिक व राजकीय न्याय ;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास , श्रद्धा व उपासना यांचे
स्वातंत्र्य ;
दर्जाची व संधीची समानता ;
निष्टीपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये
व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवार्धीत करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ;
आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर , १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
